हनवतखेडा येथील बापूराव गणगे वयाच्या १०५ व्या वर्षी अनंतात विलिन.
मंठा- तालुक्यातील हनवतखेडा येथील आदर्श व्यक्तिमत्त्व बापूराव दादाराव गणगे यांचे दिनांक ८ सप्टें. २०२४ रविवार रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झाले.
बापूराव गणगे हे अत्यंत धार्मिक, आध्यात्मिक व आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचीत होते.युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे यांचे ते आजोबा होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, तीन सुना, सहा नातवंडे, असा परिवार असून त्यांच्या अंत्यविधीत पंचक्रोशीतील मित्र,नातेवाईक, गावकऱ्यांची उपस्थिती होती. हनवतखेडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Users Today : 138