जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर 375 वर्ष अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त बुलडाणा जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीने, हभप श्री दामू अण्णा महाराज शिंगणे, जिल्हाध्यक्ष वारकरी महामंडळ यांच्या नेतृत्वात मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संत नगरी शेगाव पर्यंत भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारोप शेगाव येथे ८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते सिद्धार्थ खरात म्हणाले की, मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव ही दिंडी वारकरी अनुष्ठान घेऊन पुढे निघाली आहे. वारकरी समाज मुख्य प्रवाह आहे. घराघरात माती मातीमध्ये जर कुठली विचारधारा असेल तर ती वारकरी समुदाय आहे. पांडुरंग आणि विठ्ठल हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. संत परंपरा हीच खरी परंपरा आहे. या परंपरेने समाजाच्या समस्या मिटवल्या आहेत. वारकरी समुदायांनी महाराष्ट्र धर्म चळवळ निर्माण केल्या. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांवर चळवळींचा प्रभाव पडलेला आहे. संत परंपरा वारकरी परंपरा व शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळी या परस्पर पूरक चळवळी आहेत. या चळवळीचा मिलाप घालण्याचा माझा प्रयत्न आहे.
समाजाला जर नैतिक अधिष्ठान व सामाजिक उंची वाढवायची असेल तर वारकरी चळवळी शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी केले. तर चळवळीला बळ देण्यासाठी सिद्धार्थ खरात यांच्याकदून ५१ दिंड्यांना ३५१ टाळ, ५१मृदुंग (पकवाद)५१ विना वाटप करण्यात आले. यावेळी पांडुरंग दादा पाटील, हभप श्री दामू अण्णा महाराज शिंगणे, हभप श्री राजेंद्र महाराज तळेकर, हभप श्री भागवत महाराज माळेकर, हभप श्री संतोष महाराज खडसे, हभप श्री रामदास महाराज धांडे, हभप श्री किरण महाराज शिंदे, विणेकरी बद्रीनाथ हुसे महाराज, विनोद पाटील दांदडे, सहदेव महाराज, पंडित देशमुख, त्र्यंबक अवधूत, गजानन राठोड, रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
Users Today : 138