*आर टी आय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन*

Khozmaster
2 Min Read
!सर्व शासकीय कार्यालयामध्ये 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिवस साजरा करा !!
~~~~~~~~~~~~~~~~~
  हिंगोली;सविस्तर वृत्त असे की हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२४ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी आरटीआय महासंघाच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे!माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून! या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सष्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन  निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक :२० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.शाशन निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर  प्रश्नमंजूषा,,चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी  विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार  दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी.या वर्षी २८ सप्टेंंबर २०२४ या दिवशी  चौथा शनिवारची सुट्‌टी व २९ सष्टेंबर ला रविवार असल्यामुळे  शासकीय  निर्णयाप्रमाणे सदर माहिती अधिकार दिन  हा  २७ सष्टेंबर २०२४ किंवा  ३० सष्टेंबर २०२४ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात अशी मागणी आर टी आय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष पंडितराव तिडके हे उपस्थित होते तसेच जिल्हा उपाध्यक्ष रियजिदोजीन काजी, सचिन दराडे, विश्वनाथ नरवाडे, बद्रीनाथ गलंडे, रविकुमार गोरे, प्रशांत बाभुळकर,
गजानन टोकलवाड, गिरीधर सरकटे, प्रमानंद खंदारे, संदीप बादड, धम्मपाल वाढवे, राजू जटाळे, नितीन दवणे, खदीर शेख, मारोती बनसोडे  इत्यादी सभासद उपस्थित होते
0 9 4 5 7 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *