डाभा शाळेचा व शिक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव सन्मान

Khozmaster
2 Min Read
 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा :- केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डाभा ता सोयगाव शाळेची नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून
निवड करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाभा ता.सोयगाव शाळेतील शिक्षकांचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब व माननीय स्वामी साहेब जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार स्वीकारताना केंद्रप्रमुख/मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख जनार्दन साबळे ,प्रा शा डाभा शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णु डोखले,शिक्षकवृंद रविंद्र तायडे  सर , श्रीजय वाणी सर ,संजयकुमार चव्हाण सर, सुनीलकुमार गव्हाळे सर , यांनी स्वीकारला. ह्या तापडिया नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार सोहळ्याच्या आयोजन केले होते.
यावेळी शिक्षणाधिकारी  जयश्री चव्हाण मॅडम, शिक्षणाधिकारी( योजना )अरुणा
भूमकर मॅडम,
सोयगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय रंगनाथ आढाव साहेब,  शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय रमेश जी ठाकूर साहेब , ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी राजीव फूसे  साहेब, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव फुसे साहेब, उपशिक्षणाधिकारी व्यंकट कोमटवार साहेब, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाभा जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून  नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून शाळेची निवड झाली त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा उत्साह वाढलेला आहे.या शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचा आयोजन केले जाते. सर्व शिक्षक त्यासाठी प्रयत्न करत असतात. या शाळेत घाणेगाव तांडा, नांदा तांडा, सावळद वारा येथून विद्यार्थी प्रवेशित आहेत. शाळा विकासासाठी विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सहकार्य शाळेला वेळोवेळी लाभत असते. पुरस्कारामुळे आता आम्हा सर्वांची आणखी जबाबदारी वाढली आहे व ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू असे केंद्र प्रमुख जनार्दन साबळे केंद्रप्रमुख सावळद बारा, शिक्षकवृंद यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी  बोलताना सांगितले.
0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *