एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं,

Khozmaster
2 Min Read

कर्जत तालुक्यातील पोशिर येथे मालमत्तेच्या वादातून भावाने तिघांची हत्या केल्याचा संशय असून या प्रकरणी मदन याचा भाऊ, वहिनी आणि भावाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चित्रपट आणि गुन्हेविषयक मालिका पाहून हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथे मदन पाटील हा पत्नी अनिशा आणि मुलगा विवेक (१०) यांच्यासह राहत होता. विवेकच्या आग्रहामुळे यंदा प्रथमच त्यांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी सकाळी पोशिर, चिकनपाडा येथे या तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तिघांची हत्या केल्याचे समोर आले होते. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन आणि त्याचा भाऊ हनुमंत यांच्यात मागील चार महिन्यांपासून घराच्या वाटणीवरून वाद सुरू होता. त्यातूनच मदन याची पत्नी आणि मुलासह हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आशा सेविका असलेली अनिशा आणि मदन हे गावकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून येत असल्याने त्यांच्या हत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा म्हणून मयताचा भाऊ हनुमंत मयतासोबत वाद करत होता. यावर्षी त्यांच्या घरात प्रथमच गणपती बसवला होता. हनुमंतने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवले होते. ७ सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जाते. आरोपीनं हत्या करण्याआधी विनायकाच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यानंतर त्यानं विनायकाला संपवलं. सकाळी १० वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात १० वर्षीय मुलगा विवेक आणि ३० वर्षीय पत्नी अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह आढळून आला. तर घरामध्ये मदन जैतू पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नेरळ पोलीस आरोपींना ताब्यात घेतलं. तिघांचे मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *