प्रसाद रानडे, रायगड पुणे धनकवडी येथून निघालेल्या एका कारचालकाने आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज पत्नीच्या मोबाईलवर पाठवला. त्यानंतर या व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं, रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटाजवळ असलेल्या भोर हद्दीत घडली आहे. श्रीकांत विलास देशमुख असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या श्रीकांत देशमुख यांच्या पत्नीने तात्काळ याची माहिती भोर पोलिसांना दिली. भोर पोलिसांच्या व भोईराज रेस्क्यू टीम यांच्या मदतीने रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटाजवळ असलेल्या ठिकाणी या संबंधित व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात रविवारी रात्री उशिरा यश आला आहे.
पत्नीसोबत भांडण झालं, पती गाडी घेऊन निघाला
घरात पत्नीसोबत भांडण झालं होतं. याच वादाचा राग मनात धरून श्रीकांत कार घेऊन भोर घाटाकडे निघाले. ज्या परिसरात त्यांनी आयुष्य संपवलं त्या ठिकाणाचे लोकेशन त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर शेअर केले आणि ‘मी आत्महत्या करत आहे’, असा मेसेज त्यांनी पत्नीला पाठवला. त्यानंतर पत्नीने तात्काळ भोर पोलिसांना याची माहिती दिली. तसेच संबंधित रेस्क्यू टीम यांनाही याची माहिती देण्यात आली भोर तालुका प्रशासनाने यासाठी या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तात्काळ रात्री उशिराच युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केले.
भोर तहसीलदार राजेंद्र नजर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, निवासी नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे आदी कर्मचारी व भोईराज रेस्क्यू टीमचे पथक यांनी रात्री उशिरा लाईटची व्यवस्था करून हे सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू केलं व रविवारी रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीचा मृतदेह सापडला.
श्रीकांत देशमुख यांची पत्नी व दोन लहान मुलं बोर पोलीस स्थानकात दाखल झाली होती. श्रीकांत यांचा रात्री मृतदेह सापडल्यानंतर सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर हा मृतदेह त्यांच्या पत्नीच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. श्रीकांत देशमुख यांनी इतके टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली? याबाबत आता भोर पोलीस पुढील तपास करत आहेत. पत्नीसोबत वाद झाल्याचे प्राथमिक कारण समोर आलं आहे. श्रीकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे. श्रीकांत त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. श्रीकांत देशमुख यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Users Today : 18