दुकानासमोरुन ये-जा करत असल्याचा राग, दोन्ही भावांकडून बेदम मारहाण, निष्पापाचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. माणसाची हत्या करणं म्हणजे आता डाव्या हाताचा खेळ झालाय. असाच काहीसा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात घडला आहे. गावात असलेल्या दुकानासमोरून एक व्यक्ती ये-जा करायचा. त्याचा राग आल्याने ”तू आमच्या दुकानाच्या समोरून का जातो दुसरा रस्ता नाही का? असं विचारत दोघा भावांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे ९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे हनुमान मंदिराजवळ आरोपी यशवंत मोरे याचे दुकान आहे. त्या दुकानासमोरून दयाराम साठे ये जा करीत असत. याचा राग येऊन ९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान यशवंत मोरे याने दयाराम साठे यांना अडवलं. ”तू आमच्या दुकानाच्या समोरून का जातो? तुला दुसरा रस्ता नाही का? असे म्हणत शिवीगाळ केली. यादरम्यान यशवंत मोरे याचा भाऊ अनिल मोरे याने दयाराम साठे यांना लाकडी दांड्याने डोक्यावर तसेच पाठीवर मारहाण केली. यशवंत मोरे याने लाथा बुक्क्यांनी पोटावर मारहाण केली. या मारहाणीत दयाराम साठे (वय ५२, रा. खेडदिगर ता. शहादा) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरती जितेंद्र रामोळे यांच्या फिर्यादीवरून अनिल हिरामण मोरे आणि यशवंत हिरामण मोरे दोन्ही रा. खेडदिगर ता. शहादा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *