एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. राजकीय प्रघातानुसार एखाद्या आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना तिकीट दिल्यास त्याविरोधात उमेदवार न देण्याचा संकेत पाळला जातो. परंतु भाजप नेते मुरजी पटेल या जागेसाठी अडून बसल्याने त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. अखेर, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने त्यांना सूचना देत माघार घ्यायला लावली आणि अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.
२०२२ मध्ये म्हणजेच दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेला उजाळा देण्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक. दोन वर्षांपूर्वी हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप नेते मुरजी पटेल उत्सुक आहेत. त्यांनी पुन्हा अंधेरी पूर्वच्या जागेवर दावा सांगितला आहे. परंतु अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी मुरजी पटेल यांना भाजपने अर्ज मागे घ्यायला लावल्यामुळे ते नाराज झाले होते. आता पुन्हा त्यांना इच्छांना मुरड घालावी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीत नेमकी काय बातचित झाली, हे स्पष्ट झालं नाही. परंतु मुरजी ही जागा भाजपला सोडवून घेण्यात यशस्वी होणार का? की ते मैत्रीपूर्ण पक्षांतर करुन शिवसेनेतून लढणार, असा सवाल निर्माण झाला आहे.