सपोनि प्रफुल्ल साबळे यांची मोठी कारवाई आरोपी जेरबंद
सोयगाव तालुक्यातील चारुतांडा येथील शेतकऱ्यांने पपईच्या झाडांत गांज्याची लागवड केली असता फर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत सवळदबारा दूर शेत्र अंतर्गत मूर्ती शिवार गट नंबर 110 येथे आरोपी शेतकरी आकाश भगवान राठोड वय 20 वर्ष राहणार चारू तांडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर याने त्याच्या शेतात पपईच्या झाडांमध्ये गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती सपोनि प्रफुल्ल साबळे यांना प्राप्त झाल्यावर वरून तात्काळ पूर्ण स्टापसह नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाची पाच फूट उंचीचे अशी लहान मोठी ( 24 ) एवढी झाडे मिळून आली त्याचे वजन ५० किलो शेतात मिळून आला गांजाच आहे अशी खात्री झाल्यावर पंचानामा करुन आरोपीला ताब्यात घेऊन फर्दापूर पोलीस ठाणे येथे येऊन अमली पदार्थ विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. सदरची पुढील तपास चालू आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड सर,मा.अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सिल्लोड डॉ.दिनेशकुमार कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रफुल्ल साबळे ,पोउपनि सुग्रीव चाटे,पोहेका मिरखा तडवी,पोका-भरतकोळी,पो काॉ प्रकाश
कोळी,पो.का.बेदरकर,पो. का. कोळी व सोबत तीन होमगार्ड यांनी केली.यामुळे फर्दापूर व सावळदबारा परिसरात चोरीचे गांजाचे झाडे लावणऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
Users Today : 0