चिखली:
केंद्रातील सत्ता काबीज करतांना भाजपाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला दुप्पट भाव देवू, सरसकट कर्जमाफी, थकीत पिकविम्याचे चुकारे तात्काळ देवू अशी आश्वासने देत शेतकऱ्यांचा भ्रम निराश केला होता. मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा केंद्र व राज्य सरकारला विसर पडला असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या बळीराजाला उभारी देण्याबरोबरच सोयाबीन ला किमान ७००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा व इतर शेतकरी मागण्या व न्यायहक्कासाठी महाविकास आघाडीच्या वतीने चिखली तहसील कार्यालयावर १८ सप्टेंबर रोजी भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांचा सहभाग लक्षणीय ठरणार आहे. या शेतकरी संघर्ष मोर्चात सर्व शेतकरी बांधव, कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षणीय उपस्थितीत, सोयाबीनला किमान ७००० रुपयाचा हमी भाव, सरसकट कर्जमाफी, थकलेला पीकविमा ,सिंचन अनुदान, किमान १२ तास वीज पुरवठा इत्यादी शेतकरी न्यायहक्काच्या मागण्यांसाठी या शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या या शेतकरी संघर्ष मोर्चाच्या निमित्याने ९ सप्टेंबर रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी संघर्ष मोर्चा साठी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण परिसर पिंजून काढीत गावभेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधने सुरु केले असून शेतकऱ्यांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या भेटी दरम्यान ग्रामस्त व शेतकऱ्यांशी संवाद साधतांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आगामी मोर्चाच्या योजनेवर चर्चा करण्यात येत आहे. त्याच बरोबर ग्रामस्त व शेतकरीवर्ग बिनधास्त पणे त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी स्पष्टपणे मांडताना दिसून येत आहे, तर काही ठिकाणी त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी करावयाच्या ठोस उपाययोजना आदींवर भर दिल्या जात आहे. एकीकडे शेतकरी समस्या सोडविण्या बरोबरच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण सदैव कटीबद्द असल्याचे आश्वासन माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. तर ते शेतकऱ्यांशी साधत असललेल्या या संवादामुळे शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक उर्जा निर्माण होत असल्याचे त्याच बरोबर त्यांच्या समस्यांची सोडवूनुक होणार असल्याचा आशेचा सूर मतदार संघात उमटत आहे.
येत्या १८ सप्टेंबर रोजी भव्य शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व शेतकरी बांधव, कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.