छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,१०
या आजच्या काळात महिला व मुलींनी अत्यंत सतर्क
राहून पाऊले उचलावीत मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून स्वतःच्या चारित्र्य संपन्नतेला जपावे असे प्रतिपादन प्रा,नम्रता भोसले(मोहिते)यांनी वैजापूर येथे सोमवार(ता,०९)रोजी शिवयोद्धा प्रतिष्ठाणच्या द्वारे आयोजित गणेशोत्सव निमित्त कार्यक्रमात केले,त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर बोलत होत्या,आरंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,छोट्या प्राजक्ता कुंदे यांनी अहिल्या गीत सादर केले,
या प्रसंगी डॉ,राजीव डोंगरे,माजी नगरसेवक लिमेश वाणी, बापूसाहेब गावडे, सोपानराव पगार,भाजपा तालुकाध्यक्ष नारायण कवडे,डॉ,हेडगेवार पतसंस्था
चेअरमन प्रशांत कंगले,जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह
राजपूत,माजी नगरसेविका शोभा गावडे, मंजुषा ढा करे,गणेश खैरे,सोनू राजपूत,साहेबराव पडवळ,प्रकाश
गायके, ज्ञानेश्वर घोडके इत्यादी उपस्थित होते,शिवयोद्धा प्रतिष्ठाण च्या सर्व गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला,