बुलढाणा चिमुकला खेळत खेळत नदीच्या पुलावर गेला, तोल जाऊन नदीत पडला अन् जीव गमावला

Khozmaster
2 Min Read

अमोल सराफ बुलढाणा जिल्ह्यातील

खामगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नदीच्या पुलाजवळ खेळत असताना एका सात वर्षाच्या मुलाचा नदीत पडून मृत्यू झाला आहे. खामगाव तालुक्यातील कोरेगाव गावात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं

यश अरुण बोदडे असं मृत मुलाचे नाव असून तो दुसरीमध्ये शिकत होता. यश आणि त्याचे मित्र खेळत खेळत गावाजवळील नदीजवळ पोहोचले. नदीच्या पुलावर खेळत असताना यशचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहू लागला आणि पुलाच्या मोरीमध्ये जाऊन अडकला. या घटनेची माहिती मिळताच गावातील गावकरी आणि प्रशासन घटनास्थळी हजर होऊन शोधकार्यास सुरवात झाली. अखेर यश याचा मृतदेह सापडला असून त्याला बाहेर काढण्यात आले. नंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेने बोदडे कुटुंबियांसह समस्त ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुलाला संरक्षण कथडे बांधण्यात आले नव्हते. याआधी फक्त 13 बंब टाकून पूल तयार केला होता. घडलेल्या घटनेवरून लोकांमध्ये रोष वाढला असून ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासन याची दखल घेते का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

नागपूरमध्येही घडली होती घटना

काही दिवसांपूर्वी नागपूरमधील खापरखेडा येथील भानेगाव-पारशिवनी रस्त्यावरील कन्हान पुलावरून पती-पत्नी मॉर्निंग वॉकला जात असताना तोल जाऊन नदीत पडल्याची घटना घडली होती. यात पतीचा मृत्यू झाला होता तर पत्नीचा जीव वाचला.

प्रशांत शेषराव पोटोडे (वय 40) असे मृतकाचे नाव होते. तर संध्या प्रशांत पोटोडे ( वय 34) असे मृतकाच्या पत्नीचे नाव आहे. हे बीना भानेगाव येथील रहिवाशी आहेत. हे दोघेही भानेगाव ते पारशिवनीमार्गे कन्हान नदीच्या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मॉर्निंग वॉकनंतर दोघेही पुलाच्या काठावर बसले होते. अचानक प्रशांत पटोडे यांना चक्कर आली. आणि त्यांचा तोल जाऊ लागला त्यानंतर प्रशांत यांच्या पत्नीने त्यांचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांच्या पत्नीचाही तोल गेला आणि ते दोघेही पुलाखाली पडले. त्यानंतर दोघेही पाण्यात वाहू लागले. या घटनेत प्रशांत शेषराव पोटोडे यांचा मृत्यू झाला होता.

0 6 3 6 5 3
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *