दहा वर्षांनी बाळ झालं, पुण्याला जाताना मद्यधुंद चालकाची धडक, कुटुंबातील चौघांचा बाळासह मृत्यू

Khozmaster
2 Min Read

ड्रंक अँड ड्राइव्हमुळे पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने आपल्या स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये दीड महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि सात वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकजण गंभीर असल्याची माहिती आहे. पुमिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी, आईसह दीड महिन्याच्या चिमुकला आणि सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली.ण्याच्या दिशेने हे कुटुंब जात असताना हा भीषण अपघात घडला असून यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.धक्कादायक म्हणजे दारु पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबेजळगाव येथे हा अपघात झालाया अपघातात मृणाली अजय देसरकर, आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर (दीड महिने) आणि दुर्गा सागर गीते (७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत. देसकर कुटुंबाच्या घरात दहा वर्षांनी पाळणा हलला होता. पण कदाचित नियतीला त्यांचं सुख बघवत नव्हतं. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहेया प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाळुज एमआयडीसी पोलीस दाखल करण्यात आला आहे.

0 9 4 5 7 6
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *