भाज्यांपाठोपाठ आता ‘तडका’ महागला! सोयाबीन-सूर्यफूल तेलदरात १३० रुपयांची वाढ

Khozmaster
2 Min Read

अगोदरच भाज्यांच्या दरवाढीने हैराण झालेल्या नाशिककरांना आता खाद्यतेलाच्या दरवाढीचाही फटका बसत आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांत सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या पंधरा किलो किंवा लिटरच्या डब्यामागे सरासरी १२० ते १३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकातील तडकाही आता महागला आहे.

मागील महिनाभरापासून भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. अशातच खाद्यतेल स्थिर असल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र, दहा ते बारा दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरातही वाढ होत आहे. सरकारने काही दिवसांपासून सोयाबीन, मोहरी आणि इतर तेलबियांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेलबियांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम खाद्यतेलाच्या दरावरही होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. बाजारात सूर्यफूल तेल १२० रुपयांनी महाग झाले आहे. सोयाबीन तेल १२० ते १३० रुपयांपर्यंत महागले आहे. शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर असल्याचेही व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चणाडाळीच्या दरांत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी शंभर रुपये किलोपर्यंत असलेली चणाडाळ आता ११० ते ११५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. येत्या काळातही ही दरवाढ कायम राहणार असल्याची शक्यता आहे.बाजारात महिनाभरात नारळ आणि खोबऱ्याच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. नारळ क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपये, तर प्रतिनग दोन ते तीन रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर खोबऱ्याचे दरही किलोमागे ६० ते ७० रुपये किलोने वाढले असून, काही दिवसांपूर्वी १८० रुपये किलो असलेला दर २४० रुपयांवर गेला आहे. येत्या काही दिवसांत खोबरे किलोमागे आणखी दहा ते वीस रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

बाजारात खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. खाद्यतेलासह मखाना, काजू, बदाम, चणाडाळ, खोबरेही महागले आहे. येत्या काळात चणाडाळ आणि खोबरे अधिक महागण्याची शक्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *