मध्य रेल्वेची प्रवाशांना दिवाळी भेट! नागपूरहून पुणे-मुंबईसाठी धावणार विशेष सुपरफास्ट ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Khozmaster
1 Min Read

दिवाळीच्या काळात पुण्या-मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात पुणे तसेच मुंबईसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या गाड्यांचा तपशील असा :
०१२०९ नागपूर – पुणे सुपरफास्ट – ही गाडी २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या काळात दर शनिवारी नागपूरवरून १९.४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहचेल.
०१२१० पुणे – नागपूर सुपरफास्ट एसी ही गाडी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी पुण्याहून १५.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला आठ स्लीपर, दोन थर्ड एसी, सहा जनरल असे कोच राहतील.

०२१३९ एलटीटी-नागपूर सुपरफास्ट ही गाडी ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी एलटीटीवरून ००.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
०२१४० नागपूर-एलटीटी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी नागपूरवरून १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *