शिक्षण महर्षी कर्मयोगी ऋषीतुल्य तात्यासाहेब बोंद्रे यांच्या व्दितीय जयंती निमित्त नेत्र शिबीराचा हजारो रूग्णांनी घेतला लाभ

Khozmaster
5 Min Read

अनुराधा मिषनचे रूग्नसेवेच्या कार्यातुन अंधारलेल्यांचे जिवन झाले प्रकाषमय – डॉ. विकास बाहेकर
शिबीरात 2688 रूग्णांची तपासणी, 1570 चष्म्यांची नोंदणी तर 346 रूग्ण ठरले शस्त्रक्रीयेस पात्र      गत 33 वर्षापासुन अविरतपणे ‘रूग्णसेवा हिच ईष्वर सेवा’ समजुन तपासणी बरोबरच उपचारासाठी सातत्यपुर्ण आरोग्य विषयक विविध शिबीरांचे आयोजन अनुराधा मिषनच्या माध्यमातुन कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांचा शिवभावे जिवसेवेचा वसा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे हे अवीरतपणे पुढे चालवित आहेत. अनुराधा मिषनच्या माध्यमातुन आजवर विविध आजारांच्या शेकडो षिबीरांचे आयोजन यषस्वी झाले असुन त्यात लाखो रूग्णांनी लाभ घेतला आहे. आजवरच्या रूग्नसेवेच्या कार्यातुन असंख्य अंधारलेल्यांचे जिवन प्रकाशमय झाल्याचे प्रतिपादन बुलडाणा येथील नामवंत नेत्र चिकीत्सक डॉ. विकास बाहेकर यांनी केले. षिक्षण महर्षी कर्मयोगी तात्यासाहेबांच्या व्दितीय जयंती निमित्त दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झालेल्या भव्य निषुल्क नेत्र चिकित्सा षिबीर प्रसंगी आमदार राहुलभाउ बांेद्रे यांच्यासह जळगांव, अकोला, जालना, वाषिम व बुलडाणा जिल्हयातील नामवंत नेत्ररोग तज्ञांची उपस्थिीती होती.

  आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी  शिबीराचा तालुक्या भरातुन आलेल्या गरजु रूग्णांनी लाभ घेतला. यामध्ये 2688 रूग्णांच्या विविध नेत्र तपसण्या करण्यात आल्या, तर 1570 रूग्णांची चष्म्ये वाटपकरीता निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या तपासणी अंती सुमारे 346 रूग्ण शस्त्रक्रेयेस पात्र ठरले असुन गोदावरी फाउंडेषन जळगांव व जिल्हा सामान्य रूग्णाल बुलडाणा येथे शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. या षिबीर प्रसंगी जिल्हाभरातुन आलेल्या नामवंत चिकित्सक मंडळीत डॉ. विकास बाहेकर, डॉ. संदेष राठोड, डॉ. शोन चिंचोले, डॉ. मोरवाल, डॉ. पंकज शेटे, डॉ. दिपाली पाटील, याच्यासह उल्हास पाटील गोदावरी फाउडेषन जळगांवचे डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. परीतोष मल्मवार, डॉ. नम्रता महाजज, डॉ. उमा गायकवाड, डॉ. किरण, डॉ. मृदुला यांच्या टिमसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, जिल्हा शल्य चिकित्सह बुलडाणाा, जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सामान्य रूग्णालय अकोलाचे डॉ. राजश्री भुईभार व श्रीमती षितल घुगे, निलेष चव्हाण, संजय राजपुत, सुनिल रामसिंग आयुर्वेद महाविद्यालय चिखली, यांच्यासह डॉ. कुलदिप भोलाने, डॉ. शरद पाटील नांदुरा, डॉ. आनंद पबीतवार, डॉ. षिल्पा गुप्ता, डॉ. सार्थक शहा, डॉ. प्रतिभा कंकाळ, डॉ. के.आर.बियाणी, प्राचार्य आर.एच.काळे, प्राचार्य पागोरे, प्रा.कुळकर्णी यांची उपस्थिती होती.
शिक्षण महर्षी कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या व्दितीय जयंती निमित्त आयोजित या भव्य नेत्र चिकित्सा षिबीरात ग्रामीण रूग्णालय चिखली येथील प्रिया विनकर, वैद्यकीय अधिक्षक उमर सैयद, विनायक पाठक, अजाका फामा, निलेष पाटील, विनोद गिरी औषाधी प्रतिनिधी, मॅनकाईड फार्माचे जयंत शर्मा, चिरायु मेडीकल, आनंद मेडीकल चिखली यांनी रूग्णांना मोफत औषधी देवुन रूग्णांनासेवा दिली. तर या षिबीर प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी, ग्रामीण रूग्णलय चिखली यांचे विषेष सहकार्य लागले. या षिबीराला विषेष तज्ञ म्हणुन उपस्थित असलेल्या चमुत दिनेष वाणी, रवि सोळंकी, पि.एन.चोैथनकर, विकी जाधव, ईष्वर सरनाईक, विलास इंगळे, विषाल सुरडकर, कृष्णा मोदे, मेहकर येथील सवडतकर, लोणार येथील गाडेकर, जानेफळ येथील क्षिरसागर, डोणगांव येथील गि-हे यांची विषेष उपस्थिती होती.
या शिबीर प्रसंगी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे, विष्वस्त सिध्देष्वर वानेरे, डॉ. विष्वनाथ यादव, आत्माराम देषमाने, जितेंद्रदादा बोद्रे, वर्धमानसेठ डहाळे, समाधान सुपेकर, अतहरोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, रामदास मोरे, डॉ. संजय घुगे, बिदुसिंग इंगळे, षिवराज पाटील, मिसाळ सर, शरद पाटील, प्रदिप चिंचोले, मलीकभाई जमदार, हाबीब भाई अंबाषी, गोकुळ शिगणे, विजय गाडेकर, दिपक थोरात तर प्राचार्य डॉ. कैलाष बियाणी, डॉ. रविंद्र काळे, डॉ. पागोरे, प्रा. उन्मेष जोशि, प्रा. कुलकर्णी, अनुराधा अर्बनचे नितीन गायके, प्रा. सोफिया, यांच्यास अनुराधा मिषनच्या पदाधिकारी व कर्मचा-यांनी कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. नेत्र षिबीराचे सुत्रसंचलन व आभार प्रर्दषन प्रा.उन्मेष जोषी यांनी केले.

मानवरूपी ईष्वराची सेवा म्हणजेच खरी ईष्वर सेवा – राहुलभाउ बोंद्रे

आपला आनंद, ईच्छा, आकांक्षांवर तुळशिपत्र ठेवुन, आगोदर जनकल्याण करा आणि मानसातल्या ईष्वराची सेवा करा हाच मौलीक संदेश आमचे वडील ऋषीतुल्य कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी आम्हांला दिला आहे. गत 33 वर्षापासुन अनुराधा मिषन व अनुराधा परीवाराच्या वतीने भव्य नेत्र चिकित्सा शिबीरे आयोजित करण्यात येतात. यावर्षी तिर्थस्वरूप कर्मयोगी तात्यासाहेबांची व्दितीय जयंती निमित्त षिबीरांच्या माध्यमातुन अनुराधा परीवाराने आजवर 2 लाखाच्या वर नेत्र रूग्णांची शुश्रुषा, शस्त्रक्रीया, दिव्यांगाची तपासणी, जयपुर फुट जोडणी, तथा शस्त्रक्रीया, करून हजारो गरीब आणी सामान्य कुटूंबातील अबाल ते वृध्दांपर्यत सर्व गरजु रूग्णांना मोफत ओैषधी, चष्मे वाटप, तसेच गरजु व पात्र रूग्णांवर विनामुल्य शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. आमच्या बोंद्रे परीवाराचा रूग्णसेवेचा वारसा हा अखंड सुरू राहो ही श्रुष्टी निर्मात्यास सहद्य प्रार्थना करत असल्याची प्रतिक्रीया माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी षिबीर प्रसंगी दिली.
0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *