साहित्यरत्न गणेश मंडळ, श्री गणेश मंडळ, अण्णाभाऊ साठे गणेश मंडळ तसेच राजमुद्रा गणेश मंडळ या सर्व गणेश मंडळांना भेटी दिल्या.यानिमित्ताने संपूर्ण गाव पाहता आलं, गावातील सर्व ग्रामस्थांना भेटून मनाला आनंद मिळाला. या आनंदात आणखी भर पडली जेव्हा गावकऱ्यांनी संपूर्ण गावाच्या वतीने मा. विजय मोरे सर यांच्या घरी माझे स्वागत आणि सत्कार केला यामुळे. या आदरातिथ्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. गाव फिरता-फिरता अनेक गावकऱ्यांना भेटलो, त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेतल्या. तरूणांशी बोलून गावाच्या एकंदरीत विकासासाठी काय करता येईल याचा अंदाजा घेतला. आणि प्रत्येक वेळी गणरायाच्या पाया पडत असताना त्याच्याकडे एकच मागणी केली या माझ्या आपल्या माणसांसाठी काम करण्यासाठी मला बळ दे, ऊर्जा दे.
Users Today : 1