विदर्भ विभाग प्रभारी कुणालजी चौधरी यांची राहणार विशेष उपस्थिती
बुलढाणा: आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडवर आला असून राज्यात काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य प्रभारी यांनी स्थापित केलेल्या समित्या जिल्हानिहाय आढावा घेत आहे. बुलढाण्यातही सोमवार 16 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेसची विधानसभानिहाय विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे विदर्भ विभाग प्रभारी कुणालजी चौधरी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली , विभागीय समन्वयक आमदार धिरजजी लिंगाडे, आमदार राजेश एकडे , प्रदेश कॉंग्रेस चे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार 16 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आ. लिंगाडे यांचे जनसंपर्क कार्यालय संगम चौक बुलढाणा येथे ही बैठक पार पडणार आहे.
दुपारी तीन ते पुढील वेळात जळगांव जामोद, सिंदखेड राजा मेहकर, खामगांव, मलकापुर, चिखली व बुलढाणा या क्रमानुसार विधानसभा मतदार संघनिहाय चर्चा राहणार असून काँग्रेस पक्षाची बांधणी व संघनात्मक पातळीवरची नवीन ध्येय धोरणे या बैठकीत आखली जाणार आहे. नुकतीच काँग्रसेची अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्याचीं विभागीय आढावा बैठक बुलढाणा येथे पार पाडली. त्यानंतर लगेच काँग्रेसची विधानसभानिहाय बैठक होत असल्याने ही बैठक अतंत्य महत्वाची असल्याचे अधोरेखित होत आहे
आजी/माजी आमदार, पक्ष-नेते, राष्ट्रीय व प्रदेश काँग्रेस पदाधिकारी सदस्य, जिल्हा व ब्लॉक काँग्रेस पदाधिकारी सदस्य, राष्ट्रीय, प्रदेश व जिल्हा काँग्रेस अंतर्गत फ्रंटल, सेल, आघाडीचे राष्ट्रीय, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी/सदस्य आदी सर्व मान्यवर पदाधिकारी वर्गाने या बैठकीस व चर्चासत्रास उपस्थित राहावे असे आवाहन, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
Users Today : 1