बुलडाणा :
आपला नेता खंबीरपणे पाठीशी असल्यावर कार्यकर्त्यांना हत्तींचे बळ मिळते. दडपशाही किंवा आणखी कशाचीच त्यांना भीती वाटत नाही. सध्या बुलडाणा विधानसभा मतदार संघात याचा प्रत्यय बघायला मिळतोय. मविआच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या सभेत, रॅलीत, कॉर्नर बैठकीत, गावभेटीत नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. विरोधी गटाची दहशत, धाक असतांना सुद्धा लोक प्रचंड संख्येने एकत्र येत आहेत. ही परिवर्तनाची नांदी असून याला कारणीभूत ठरलेय ते शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ८ नोव्हेंबर रोजीच्या बुलडाणा येथील सभेत जयश्रीताई शेळके यांनी केलेले तडाखेबंद भाषण.
या भाषणाने खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा खूप प्रभावित झाले. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना ताईंच्या भाषणामुळे एक विश्वास मिळाला. कुणीही समोर आले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपल्या नेत्या आपल्या पाठीशी आहेत. जयश्रीताई शेळके म्हणाल्या होत्या की, इथल्या लोकप्रतिनिधीला घाबरायचे काहीच कारण नाही. हा नकली शिवसेनेचा नकली माणूस आहे. जो म्हणतो की, मी वाघाची शिकार केली अन वाघाचा दात गळ्यात घातला. मात्र ज्यावेळी तो दात तपासणीसाठी गेला तर तो प्लास्टीकचा निघाला. तसेच लोकप्रतिनिधीच्या विकासकामाचा त्यांनी पूर्ण पर्दाफाश केला. या विशाल सभेने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये एक चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण पाहतो की, जयश्रीताई शेळके यांच्या सर्वच ठिकाणच्या सभा, बैठका, रॅलीमध्ये तुफान गर्दी होत आहे. लोक आता भीत नाहीत. सरळ व्यक्त होतात. आधी असे होत नव्हते. विरोधकांची प्रचंड दहशत असल्याने कुणी बोलण्याची हिंमत करत नव्हते. कुठल्या कार्यक्रमात सहभागी होणे, समोर येणे टाळत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नेत्याचे एक भाषण किती प्रभावी ठरु शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. मतदार संघातील घाटाखालील गाव खेड्या सोबतच धामणगावबढे, मोताळा येथे तर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने बदलाचे संकेतच दिले असल्याचे दिसून येत आहे. तसेच घाटावरील गेमचेंजर ठरणारे देऊळघाट, पाडळी, सागवन परिसर, इकबाल चौक, सुंदरखेड परिसर येथे नागरिकांचा वाढता प्रभाव पाहता महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांचा विजय निश्चित आहे, असे या अलोट गर्दीच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.
Users Today : 1