देऊळगाव साकर्शा गावाला भेट दिली,नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पपई,सोयाबीन ,कापूस, तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन गावातील ओढे नाले पुल वाहून गेल्यामुळे पुल पुर्णपणे वाहून गेला आहे.शेत रस्ते अक्षरशः उखडले आहेत, नदी काठावरील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे यामुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत आहेत.तरी प्रशासनाने तातडीने या गोष्टींकडे लक्ष देऊन या समस्या तात्काळ दूर कराव्यात अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे. मी या सर्व गावकरी आणि शेतकऱ्यांसोबत मी खंबीरपणे उभा आहे.
Users Today : 1