यानिमित्ताने तरुणांशी बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी बोलून कळालं की या तरुणांच्या मनात जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे. यांना संधी मिळवून देणे हे आपलं काम आहे, आणि त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन. तरुणांबरोबरच या ठिकाणी अनेक माता-भगिनी, लहान मुले-मुली देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमातील सर्वांचा सहभाग पाहून छान वाटले. याठिकाणी असणाऱ्या सर्वांनी आदरपूर्वक माझे स्वागत आणि सत्कार केला, त्यासाठी मी खरोखरच तुम्हा सर्वांचा आभारी आहे. यावेळी माझ्यासोबत मेहकर शहराचे शिवसेना शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, ॲड. आकाश घोडे तसेच पत्रकार संतोष अवसरमोल ही मंडळी उपस्थित होती.
आज घाटबोरी येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाला भेट दिली.
0
9
4
9
7
0
Users Today : 1
Leave a comment