आज सावरगाव मुंढे या नैसर्गिक सौंदर्याने नाटलेल्या गावी जाण्याचा योग आला. निमित्त होतं सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते गणेशराव मुंढे यांच्या आजी वयाच्या 104 व्या वर्षी निधनंतर त्यांच्या रक्षविसर्जनाचे. ऍड शिवाजी सानप यांच्या विनंती वरून सावरगाव गांधारी रस्त्यावर लोकनेते गोपीनाथजी मुंढे

यांचं सुंदर असे स्मारक उभ राहतंय… मुंढे साहेबांमुळे बहुजन समाज संघर्ष करू शिकला आणि पुढ आला. आणि येतो आहे.गोपीनाथ मुंढे साहेब हे संघर्षशील नेते होते. त्यांचं स्मारक हे सर्व समावेशक समाजासाठी प्रेरणा स्तोत्र व्हावे. सानप यांनी सर्व परिसर दाखवला. या परिसराला मध्ये गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अभ्यासिका त्यांनी यावेळी दाखवला. मुलं बहुतांशी शेतकरी कुटुंबातून येत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असते. शहरात जाऊन महागडे क्लासेस लावणे आणि वास्तव करणे त्यांच्यासाठी खर्चिक बाब असल्यामुळे स्वर्गीय मुंडे साहेबांचे हे स्मारक या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी राहील. एडवोकेट शिवाजीराव सानप यांनी हाती घेतलेला स्मारकाचा कार्याला माझ्या शुभेच्छा…!!!
सोबत सेना तालुका उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ नागरे पांग्रा डोळे सर्कल विभाग प्रमुख राजुभाऊ बुधवत गजानन भिमराव पालवे व प्रतिष्ठित गावकरी मंडळी उपस्थित होते

Users Today : 3