आज लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे गावातील राजश्री सीड्स प्रोसेसिंग कंपनीला भेट दिली.

Khozmaster
1 Min Read

या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही कंपनी उभी केलेली आहे. याचा फायदा भागातील इतर अनेक शेतकऱ्यांना होतो आहे, या कंपनीत हरभरा, तूर आणि सोयाबीन या शेतीमालाची प्रतवारी केली जाते. यामुळे शेतीमालाला मार्केट मध्ये चांगला भाव मिळवण्यासाठी मदत होते. तेथील शेतकऱ्याना भेटून या कामाची थोडक्यात माहिती घेतली. शेतीच्या विकासासाठी या प्रकारच्या प्रकल्पांचा प्रसार होणे गरजेचे आहे, त्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चालू केलेला हा प्रकल्प म्हणजे एक आदर्शच आहे. याप्रकारे स्वतःच स्वतःसाठी उभं राहणं हा स्वाभिमानी बाणा शेतकऱ्यांच्या या कामातून दिसून आला. यासारखे आणखी काही प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी माझ्यासोबत लोणार तालुका उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ नागरे, पांग्रा डोळे सर्कल चे विभागप्रमुख राजूभाऊ बुधवत, काँग्रेस पक्षाचे राजेश भाऊ मापारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *