मुंबईला जातो, शेजाऱ्यांना खोटं कारण; धुळ्यात नवरा-बायकोने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं

Khozmaster
2 Min Read

धुळे : नाशिकमध्ये काल एक हृदयद्रावक घटना समोर आली. नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई, वडील आणि मुलीने सोबत आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं अख्ख्या नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर धुळे जिल्ह्यातून देखील अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील एकाच (गिरासे) कुंटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे.धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्यान, नाशकातल्या बॉश कंपनीत काम करणाऱ्या विजय सहाणे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी कंपनीवर आरोप केले आहेत. विजयच्या आत्महत्येचं कारण हे कंपनीतील प्रशासन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नाशिकच्या बॉश कंपनीमध्ये विजय सहाणे हे गेल्या १२ वर्षांपासून काम करत होते. कंपनीच्या जाचक नियमांमुळे विजय हे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केल्याचं पाऊल उचललं असल्याची माहिती विजयच्या कुटुंबांनी दिली. विजयच्या कुटुंबीयांनी बॉश कंपनीवर गंभीर आरोप केल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *