कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तरुणीच्या अंत्यसंस्काराला तिच्या कार्यालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता, यावरून तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला होता. यावर कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी लिंक्डइनवरून एक पोस्ट करत माफी मागितली आहे.

“तुमच्यापैकी अनेकांना आमच्या पुण्यातील कार्यालयात काम करणाऱ्या ॲना सेबॅस्टियन या तरुणीच्या दु:खद निधनाबद्दल आणि तिची आई, अनिता ऑगस्टीन यांनी मला लिहिलेले दुःखद पत्र माहीत असेल”, असं राजीव मेमानी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मला खूप दु:ख झाले आहे आणि मी ही एक बाप म्हणून ॲनाच्या आईच्या दुःखाची कल्पना करू शकतो. ॲनाच्या जाण्याने त्यांच्या जीवनातील पोकळी कधीह भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबाप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. ॲनाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याबद्दल मला खेद वाटतोय. हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे वेगळे आहे. यापूर्वी कधीच असं घडले नव्हते; असं पुन्हा कधीच होणार नाही.”

0 6 2 3 5 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *