रत्नागिरी: ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोकणातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता कोकणातील विविध प्रश्नांवरती शेतकरी बागायतदार मच्छीमार हे कोकणात रत्नागिरी येथे एकत्र आले आहेत. स्वराज्य भूमी संघटनेचे संजय यादवराव यांचे नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेले आंदोलनाला आता कोणते रूप घेत हे पाहावं लागेल. या आंदोलनाला आता शासनाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर या आंदोलनाची दिशा अवलंबून असणार आहे. तसा थेट इशाराच संजय यादवराव यांनी सरकारला दिला आहे. आम्हाला स्वतंत्र कोकण नको तर स्वायत्त कोकण हे प्रमुख मागणी घेऊन यासाठी एका समितीची स्थापनाही शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी बागायतदार मच्छीमार या ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या कोकणातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.कोकणातले प्रश्न आंबा काजू बागायतदार यांचा प्रश्न मच्छीमारांचे प्रश्न स्थानिक प्रश्न तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न हे सगळे विषय घेऊन कोकणातील शेतकरी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय समोर 19 सप्टेंबर गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत विविध प्रश्न घेऊन या प्रश्नांवरती कोकण स्वराज्य भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी आंदोलन सुरू केले आहे. राजापूर या गावापासून सुरू झालेले आंदोलन आता तीव्र झाले असून गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून राजापूरपर्यंत सगळ्या तालुक्यातील शेतकरी बागायतदार सहभागी झाले आहेत.कोकणात पुरेसा निधी मिळावा आंबा ,काजू बागायतदार,मच्छिमार,शेतकरी यांना न्याय मिळावा या विकास प्रक्रियेसाठी स्वायत्त कोकणाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.कोकणातील शेती बागायती ओस पडली आहे. माकडांचा त्रास सुरू आहे त्यामुळे आमचा शेतकरी बागायतदार उध्वस्त झाला आहे. यासाठी तात्काळ एक्शन प्लान करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 27 सप्टेंबर पासून पालघर पासून जनजागरण यात्रा काढली जाणार आहे.कोकणातील आंदोलनाच्या माध्यमातून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आंदोलन प्रश्नांना मिळाला नाही तर अजूनही विधानसभा निवडणुकीत राज्य संघटना निवडणुकीचा विचार करत आहे. आम्ही दृष्टीने आता आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याजवळ चर्चा सुरू करायची माहिती यादवराव यांनी दिली.
Users Today : 18