२ दिवसांत तुझा मृत्यू! जगून घे! मॉलमधील ३० दुकानांबाहेर लाल रंगात चिठ्ठ्या, अखेर गूढ उलगडलं

Khozmaster
3 Min Read

रत्नागिरी: अलीकडे लहान मुलांना मोबाईलचे मोठे व्यसन जडलं आहे. या मोबाईलमुळे मुलं हट्टी झाली आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे अनाकलनीय गेमही खेळू लागली आहेत. इतकंच नाही तर आपण काय करतो आहोत याचंही भान त्यांना राहिलेलं नाही. लहान मुलांना मोबाईलच्या पलीकडे आयुष्यच नसल्यानं धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आता लहान मुलांकडे पालकांनी लक्ष देऊन त्यांना मोबाईलपासून दूर ठेवणं आवश्यक झालं आहे. मोबाईलचे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे गेमचे धोके लहान मुलांना समजून सांगणं आवश्यक आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या लहान मुलांनी केलेला धक्कादायक प्रकार रत्नागिरीच्या खेडमध्ये उघडकीस आला आहे.

खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटरमधील तब्बल ३० दुकानांसमोर वेगवेगळ्या चिठ्ठ्या सापडल्यानं मोठी खळबळ उडाली होती. दोन दिवस शिल्लक आहेत, जगून घे, असा मजकूर चिठ्ठ्यांमध्ये असल्यानं भीतीचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामुळे आता या सगळ्याचा उलगडा झाला असून हा सगळा प्रकार लहान मुलांच्या गेममुळे घडल्याचं लक्षात आलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तात्काळ या सगळ्याचा शोध घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.पाच ते सहा मुलं हा गेम खेळण्यासाठी बाहेर पडली होती. लहान वयातील तीन मुलांनी हा गेम खेळून या चिठ्ठ्या ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यामध्ये एका मुलासह दोन ते तीन लहान मुलींचाही समावेश आहे. मात्र या लहान मुलांच्या या सगळ्या आश्चर्यकारक व भीतीदायक चिठ्ठी प्रतापामुळे मोठ्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. लहान मुलांकडे लक्ष देऊन त्यांचं समुपदेशन करण्याची वेळ आली आहे.आयुष्य जगून घे. दोन दिवसांनी तुझा मृत्यू होणार, अशा आशयाच्या चिठ्ठ्या खेडमधील अनिकेत शॉपिंग मॉलमधील दुकानांसमोर सापडल्या आहेत. मॉलमधील २५ ते ३० दुकानांसमोर चिठ्ठ्या आढळून आल्यानं परिसरात दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी कोणीतरी शॉपिंग मॉलसमोर दुकानांसमोर जीवे मारण्याच्या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. या चिठ्ठीत लाल रंगाच्या शाईनं मजकूर लिहिण्यात आलेला आहे. ‘२ दिवसांत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी तुझा मृत्यू होईल. आयुष्य जगून घे,’ असा मजकूर चिठ्ठीत होता. चिठ्ठीच्या शेवटी ब्लडी मॅरी असं लिहिण्यात आलेलं होतं. त्यामुळे दुकानदारांसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. धमक्यांच्या चिठ्ठ्या कोणी ठेवल्या? या सगळ्यामागे नेमकं कोण आहे? असे प्रश्न दुकानदारांना पडले होते.खेडमधील अनिकेत शॉपिंग मॉलमध्ये सापडलेल्या चिठ्ठ्यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मॉलमधील ३० दुकानांच्या बाहेर इंग्रजी भाषेतील चिठ्ठ्या सापडल्यानं दुकानदार धास्तावले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक दुकानासमोर असलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलेल्या तारखा वेगवेगळ्या होत्या. सकाळच्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. धमकीच्या चिठ्ठ्यांची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *