बापूचा आशीर्वादाने स्वभाव-स्वच्छता आणि संस्कार-स्वच्छता या थीमवर काम करणार…..मा.संरपच अविनाश राठोड गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

Khozmaster
1 Min Read
मंठा :रोजी योगिधाम दहिफळ (खं) येथील श्री.योगेश्वरी भवानी मंदिर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “”एक पेड मा  के नाम”” हा अभिनय उपक्रम परमपूज्य महान तपस्वी योगानंद बापू यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात बापूच्या दर्शनानंतर भाविकांनी मंदिराच्या संपूर्ण परिसर स्वच्छ करुन करण्यात आले.त्यानंतर योगानंद बापू यांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी मा.सरपंच अविनाश राठोड, विजयभाऊ राठोड,उपसरपंच नामदेव फुफाटे ,नामदेव घुगे इतर भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी बापूंनी विविध वृक्षाविषयी माहिती देताना निम, पिंपळ,वड ई.वृक्ष ही वयोमान आणि आरोग्यासाठी उपयुक्त असतात.पुढे त्यांनी एक वृक्ष आईच्या नावाने लावायला हवे असा संदेश त्यांनी या वेळी दिला.
             मा.सरपंच अविनाश राठोड यांनी बापूच्या आशीर्वादानंतर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वभाव -स्वच्छता आणि संस्कार -स्वच्छता या थिमच्या आधारावर स्वच्छता ही सेवा हे अभियानाचा गावा गावात स्वच्छतेचा जागर करणार असल्याचे सांगितले.पुढे त्यांनी श्रमदानातुन स्वच्छता,प्लास्टिक बंदी,स्वच्छता प्रतिज्ञा ,मंदिर, कार्यालय,बाजारपेठ  स्वच्छता इतर कामे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत करणार असल्याचे सांगितले.
         या स्वच्छता अभियानात राहुल राठोड ,विकी चव्हाण, करण राठोड ,ऋतुराज चव्हाण, गोविंद सानप,नामदेव घुगे इतर अनुयायी उपस्थित होते. गांडगापूर येथील बापूजी चे गुरुबंधू यांच्या साक्षीने हा अभिनव उपक्रम कार्यक्रम पार पडला.
0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *