वैजापूर:
येथील सौंदागर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी
व नसीम करीम बेग सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने
रविवार(ता,२२)रोजी सायंकाळी चार वाजता पंचायत
समिती सभागृहात ईद-ए-मिलाद निमित्त “राष्ट्रीय एकात्मता मेळावा” आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चे अध्यक्ष डॉ,श्रीपाल सबनीस यांनी केले.अध्यक्षस्थानी पोलीस स्टेशन वैजापूरचे
पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे होते,तर प्रमुख वक्ते इस्लामिक स्कॉलर व विधान सभा सदस्य मालेगाव चे मुफ्ती इस्माईल कासमी होते,प्रमुख उपस्थिती तहसीलदार सुनील सावंत,इंजिनिअर वाजेद कादरी,व जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ठ साहित्यीक ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती,आरंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले,आयोजक सौदागर एज्युकेशन सोसायटी चे शेख शमीम सौदागर व नसीम करिम बेग सामाजिक
प्रतिष्ठाण चे अध्यक्ष ऍड मजहर करीम बेग व अहमद पठाण यांनी पाहुण्यांना एक-एक आम्र रोपटे देऊन सत्कार केला.प्रास्ताविक शमीम सौंदागर यांनी केले.
समाजातील नागरिकांनी सर्वधर्मसमभाव पाळून.एकदुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा,कुणाच्या
ही धार्मिक भावना दुःखावणार नाही याची काळजी घ्यावी ,भारतीय राज्यघटनेने दिलेले समता, बंधुता,व एकात्मता या विचारांचे पालन देशातील सर्व नागरिकांनी करावे असे आवाहन सर्व वक्त्यांनी केले,आरंभी धोंडीरामसिंह राजपूत, तहसीलदार सुनील सावंत,इंजिनिअर जावेद कादरी,मुफ्ती इस्माईल कासमी यांची भाषणे झाली.उदघाटक डॉ,श्रीपाल सबनीस यांनी ही सत्याची बेरीज व्हावी असे आवाहन केले,पो,नि, कौठाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.सूत्र संचलन शमीम सौदागर यांनी केले,आभार ऍड मजहर बेग यांनी मानले.या प्रसंगी
मजीद कुरेशी, अखिल शेख, ऍड.धरमसिंग,ऍड,प्रवीण
साखरे, ऍड,वाघ,मंजुषा ढाकरे,श्रीमती कदम,अल्ताफ बाबा,सलीम वैजापूरी,वाजेद कादरी, डॉ,गंगवाल,उर्दू मदरसाचे,नाजीम ,श्री कुरेशी,यांच्या सह शहरातील।हिंदू-मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते,
Users Today : 13