अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका

Khozmaster
2 Min Read

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकदम रोखठोक भूमिका मांडली. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची त्यांनी आज भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. “मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने किंवा राज ठाकरेची बायको म्हणून बोलत नाहीय. मी आज इथे महिला म्हणून बोलत आहे. मला स्वत:ला मुलगी आहे. मी महिलांच्या बाजूने, त्यांची एक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“आमच्यात इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. आम्ही दररोज जे पेपरमध्ये वाचतो, महिलांविरोधात हिंस्त्र गुन्हे घडतात. बलात्कार केल्यानंतर वाईट पद्धतीने खून होतो. इतर राजकारणी काय बोलतात, विरोधी पक्ष काय बोलतात, कोर्ट काय बोलतं? याचं मला काही पडलेलं नाही. महिला म्हणून मला अभिमान वाटला. त्या पोलिसांच कौतुक केलं पाहिजे. महिलांमध्ये अशी सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी असे एन्काऊंटर झाले पाहिजेत” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

‘अक्षय शिंदे कोणी संत नव्हता’अक्षय शिंदेच्या घरच्यांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “मी टीव्हीवर बघितलं. उज्वल निकम बोलले, त्यांनी भरपूर उदहारणं दिली. सगळे पुरावे कोर्टाकडे, पोलिसांकडे असल्याच त्यांनी सांगितलं. कोर्ट केस जितकी चालते महिलांमध्ये तितकी असुरक्षिततेची भावना निर्माण होते. दिल्लीतल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला सहावर्षांनी फाशी झाली. सहावर्ष अशा गुन्हेगाराला जगण्याचा अधिकार दिला. तुम्ही शक्ती कायद्याबद्दल बोलता, असा शक्ती कायदा आम्हाला अभिप्रेत आहे. आम्हाला महिलांना असा शक्ती कायदा हवा” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. अक्षय शिंदे कोणी संत नव्हता असं त्या म्हणाल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *