छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आज शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले जाते, याला काय म्हणावे? या कृत्याचा निषेध म्हणून आणि सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालो. कापसाला प्रतिक्विंटल बारा हजार हमीभाव, सोयाबीनला आठ हजार हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, ठिबक व तुषार सिंचनावरील शेती अवजारांना अनुदान मिळावे, थकीत पीकविमा मिळावा आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या आक्रोश मोर्चात करण्यात आली. सरकारने या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सत्तांचे नामोनिशाण उरत नाही, हा या मातीचा इतिहास आहे; हे सरकारने ध्यानात ठेवावे. यावेळी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष जालिंदर भाऊ बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख छगनदादा मेहेत्रे, मेहकर शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भाऊ वाघ, उल्हास भुसारे, शहेजाद शेख, नजीर शेख तसेच तरुण मुले, माता-भगिनी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 4