कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ सप्टेंबर रोजी भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र, शिक्षकांनी या संदर्भात तीव्र विरोध केला आहे. सदर विरोधाकडे शासनाचे लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी विविध प्राथमिक शिक्षक संघटनांनी निषेध आंदोलन करत आज २५ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चाची सुरुवात शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदान येथून करण्यात आली. शहरातील विविध मुख्य मार्गातून होत सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यत काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी महिला व पुरुष शिक्षकांनी तीव्र निदर्शने करीत रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पाठवले. ग्रामीण भागातीलगोरगरिबांची तसेच बहुजनांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रक्रियेतून हद्दपार केल्या जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सदर प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चात शिक्षक संघ, शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक समिती, शिक्षक परिषद, आदर्श शिक्षक समिती, अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक सेनेचे, शिक्षक भारती, पदवीधर शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, शिक्षक सहकार संघटना, उर्दू शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, एम.एड.कृती समिती, इब्टा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय महासंघ, एकल शिक्षक सेवा मंच, आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
- ५,७७२ शिक्षक सहभागी जिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांतील एकूण ६ हजार ४१३ शिक्षक आहेत. या पैकी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामूहिक रजा आंदोलनात ५ हजार ७७२ शिक्षक सहभागी झाले होते.
Users Today : 4