नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जागांवर दावा करताना स्थानिक पातळीवरील संघटनेचा आढावा घेत, इच्छुकांची शक्ती जाणून घेण्याच्या कामाला वेग आला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी शनिवारी नागपूर व रामटेकसह पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा घेतला. शिवसेना ठाकरे गटाने शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी तीन जागांवर दावा करून किमान दोन-दोन मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे संकेत दिले. नागपुरातील दक्षिण, पूर्व आणि मध्य तर, ग्रामीणमधील रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.पूर्व विदर्भातील ताट आपण सोडायचे नाही. पक्षात कुणालाही आणि कोणत्याही मतदारसंघात उमेदवारी मिळाली तरी, सर्वांनी एकत्र येऊन कुठल्याही स्थितीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना भास्कर जाधव यांनी केली.पूर्व विदर्भातील ताट आपण सोडायचे नाही. पक्षात कुणालाही आणि कोणत्याही मतदारसंघात उमेदवारी मिळाली तरी, सर्वांनी एकत्र येऊन कुठल्याही स्थितीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना भास्कर जाधव यांनी केली.पूर्व विदर्भात तरुण शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. आठ ते १० जागांसाठी आम्ही आग्रही राहू. कुठल्याही स्थितीत विधानसभा मतदारसंघांवरील दावा मागे घेतला जाणार नाही’, अशी ठाम भूमिका भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, रविवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पूर्व विदर्भातील २८ मतदारसंघांपैकी पक्षाचे काही मतदारसंघ निश्चित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीतील जागा वाटपाच्या घोळाबाबत केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता, ‘जागावाटपाचे काम आम्ही त्यांना दिलेले नाही. त्यांनी आमच्या पक्षावर बोलण्याचे टाळून स्वतःच्या पक्षाची चिंता करावी’, असे प्रत्युत्तर जाधव यांनी दिले.
सत्तारुढ भाऊ लबालब !
लाडकी बहीण, लाडका भाऊ यांसारख्या योजना सत्तेच्या खुर्चीसाठी आहेत. सत्तारुढ भाऊ लबालब आहेत. त्यामुळे योजनेचे श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अहमहमिका सुरू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.