‘हे कोर्टरुम आहे, कॉफी शॉप नाही’; सुप्रीम कोर्टात वापरलेल्या ‘या’ शब्दावर सरन्यायाधीश संतापले

Khozmaster
2 Min Read

मुंबई : सोमवारी नवी दिल्लीत भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एका वकिलाला फटकारले. याचिका माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात चौकशीची मागणीची होती. कोर्टात याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी बोलताना वकिलाने ‘या या’ असे म्हणत एका प्रश्नाला उत्तर दिले. सरन्यायाधीशांनी हेच उत्तर अधोरेखित केले आणि खडसावले की हे कोर्टरूम आहे कॉफी शॉप नाही. “असे ‘या, या, या’ म्हणू नका. ‘हो’ म्हणा हे कॉफी शॉप नाही, हे कोर्ट आहे. मला लोक ‘या, या’ म्हणणारे आवडत नाहीत,” असे स्पष्टपणे चिडलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मत मांडले.

सर्वोच्च न्यायालय २०१८ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. ज्यामध्ये माजी CJI रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारले, “पण ही कलम ३२ अंतर्गत याचिका आहे का? न्यायाधीशाला प्रतिवादी बनवून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता?” प्रत्युत्तरात, याचिकाकर्त्याने म्हटले, “या-या… माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई… मला उपचारात्मक याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले आहे…” याच प्रश्नाला उत्तर देताना याचिकाकर्ते यांनी या या शब्दांचा वापर केला होता.याचिकाकर्त्याला थांबवत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “‘या, या असे शब्द’ कोर्टात वापरू नये. हे कॉफी शॉप नाही! हे ‘या, या’ काय आहे? मला ‘या, या’ ची ॲलर्जी आहे. आम्ही अशा शब्दांना परवानगी देऊ शकत नाही. .” सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये एखाद्याच्या टोनवर आक्षेप घेतल्याची आणि कोर्टाच्या शिष्टाचाराची आठवण करून देण्याची ही घटना चर्चेची बनली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *