डाव्यांची स्वतंत्र लढाई? मविआ विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चाच करत नसल्याने नाराजी, मोठ्या निर्णयाची शक्यता

Khozmaster
3 Min Read

मुंबई : विधानसभा निवडणुकीत डावे पक्ष व संघटनांना काँग्रेसचे महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्व विचारत नसल्याच्या या संघटनांच्या तक्रारी आहेत. येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील सर्व डावे व पुरोगामी पक्ष या नव्या तिढ्याबाबत बैठक घेणार असून, निवडणुकीत स्वबळावर उतरावे लागल्यास करण्याच्या तयारीबाबत चर्चा करणार असल्याचे माकप व शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पक्षाला देशभरातील उदारमतवादी छोटे डावे पक्ष व संघटना यांनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातही अनेक पक्ष संघटनांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली होती; मात्र लोकसभेत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाची हवा काँग्रेस नेतृत्वाच्या पूर्णपणे डोक्यात गेल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पक्षाला देशभरातील उदारमतवादी छोटे डावे पक्ष व संघटना यांनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातही अनेक पक्ष संघटनांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली होती; मात्र लोकसभेत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाची हवा काँग्रेस नेतृत्वाच्या पूर्णपणे डोक्यात गेल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.विधानसभेला या डाव्या व उदारमतवादी पक्ष संघटनांना निवडणुकीत प्रतिनिधित्व दिले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी दिले होते; मात्र आता विधानसभा निवडणुकांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असतानाही या संघटना व पक्षांना काँग्रेसकडून ना चर्चेचे निमंत्रण आहे, ना किती वा कोणत्या जागा काँग्रेस सोडू शकते याबाबतची कोणतीही पुसटशी कल्पनाही या पक्षांना देण्यात आलेली नाही. शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांना काँग्रेस जागा सोडणार किंवा नाही, याबाबत कोणतीही कल्पना दिली जात नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते आमचे निर्णय दिल्लीत होतात, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.अदानी समुहाला केवळ काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेच विरोध करत असल्याचा भ्रम पसरवायचा व दुसरीकडे तेलंगणामध्ये नव्यानेच आलेल्या रेवंथ रेड्डी यांनी हजारो कोटींचे प्रकल्प त्यांना द्यायचे. हिमाचल प्रदेशमध्ये कारणाशिवाय हिंदु-मुस्लिम तणाव भडकवायचा व हरयाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्रात मुस्लिमांचे आपणच तारणहार असल्याचे दाखवायचे, हे काँग्रेसचे जुनेच खेळ नव्या वेष्टनात गुंडाळून सुरू असल्याचे डाव्या व उदारमतवादी नेत्यांचे म्हणणे आहे.काँग्रेसही अहंकारात’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर राहुल गांधी यांचा वरदहस्त असल्याचे ते सांगत असल्याने ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना विचारत नाहीत, तर आम्हाला काय विचारणार, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही याबाबत एका ज्येष्ठ डाव्या नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली. ही टीका तुम्ही जाहीर का करत नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘सध्या राज्यावर असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात आम्ही आमची सगळी कारकीर्द खर्ची घातली आहे. आजही युती हरावी हेच आमचे म्हणणे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सोबतच राहावे, अशीच आमची इच्छा असून त्यात अडथळा आणण्याचा आमचा मानस नसल्याने आम्ही अद्याप गप्प आहोत. मात्र काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारप्रमाणेच अहंकारात राहाणार असेल तर काँग्रेसचे खरे जातवर्गीय चारित्र्य आम्ही पूर्ण ताकदीनिशी लोकांसमोर आणूच.’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *