मुंबई : मुंबईमधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एकाच घरातील ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अशी माहिती पालिकेने दिली आहे. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. इतर नागरिकांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. या घटनेमध्ये एका ७ वर्षीय मुलीचा आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या ही आग विझविण्यात आलेली आहे. पॅरिस गुप्ता, मंजू गुप्ता, अंकिता गुप्ता, प्रेम गुप्ता आणि नरेंद्र गुप्ता असं मयतांची नावे आहेत. राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, ”चेंबूर येथे लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले. मृतांचे मित्र आणि कुटुंबियांना माझ्या संवेदना आणि त्यांना शांती आणि शक्ती मिळो ही प्रार्थना”, असं ट्वीट करत कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी मृतांना आदरांजली वाहिली आहे.