सेनगाव तालुक्यातील माझोड या ठिकाणी रेणुका माता संस्थान वर आम आदमी पार्टी इच्छुक उमेदवार बालाजी भाऊ देशमुख यांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read

रेणुका माता संस्थान वर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचक्रोशीतील भक्तमंडळी मोठ्या उत्साहात रेणुका माता संस्थान माझोड या ठिकाणी आरतीला आवर्जून उपस्थित राहतात. माहूर येथील रेणुका मातेचे एका भक्तासाठी माझोड या ठिकाणी आपल्या भक्ताला कायमस्वरूपी दर्शन घडावे या उद्देशाने रेणुका माता माझोड या ठिकाणी विराजमान झाले आहेत.
रेणुका मातेची सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे.
नवसाला पावणारी माता रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरता पंचकोशीतील तसेच बाहेर जिल्ह्यातील मंडळी सुद्धा रेणुका माता संस्थान माझोड या ठिकाणी दरवर्षी आवर्जून दर्शनासाठी येत असतात.
दररोज या ठिकाणी आरती घेण्यात येते
तसेच दैनंदिनी फराळाची व्यवस्था अन्नदात्याकडून केल्या जाते.
नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते
परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती रेणुका माता संस्थान माझोड तर्फे करण्यात आली आहे

0 9 4 9 7 3
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *