११ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेत समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे: संघपाल पनाड.

Khozmaster
1 Min Read
लोणार:-(तानाजी मापारी)
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने रेखाताई ठाकूर,अशोक सोनोने, धैर्यवर्धन पुंडकर, सविताताई मुंडे,निलेश जाधव,प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे,डॉ.प्रा.केबी इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लोणार व मेहकर येथे वडगाव, सुलतानपूर,चिंचोली सांगळे,लोणार शहर येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्या.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून.जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांनी आंबेडकरी चळवळी संदर्भात मार्गदर्शन करुन समाजाने व्यसनापासून दूर राहून कुटुंबासह समाजाला उंच स्थानावर न्यावे व बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समाज जागृतीचे,समाज रक्षणाचे,काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत.त्यामुळे समाजाने कुठल्याही भुलथापांना बळी न पडता बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे.११ ऑक्टोंबर २०२४ रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.यावेळी प्रस्ताविक डॉ.प्रा.केबी इंगळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन दिपक अंभोरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई नरवाडे, शाकीरभाई पठाण,महेंद्र मोरे,प्रशिक इंगळे,जेष्ठ नेते सुभाष मोरे,ॲड, बबन वानखेडे,दिपक पाडमूख,प्रदीप सरदार,राहुल सरदार,अनिल प्रधान  अचित पाटोळ,मिलिट्री मॅन मोरे,दिनकर कांबळे,बबन पनाड,विलास खरात, वसीम भाई यांनी परिश्रम घेतले यावेळी शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते..
0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *