अखेर घातपाताचा संशय असलेल्या त्या दोन मृतकांवर ३६ तासानंतर खुरमपूर येथे अंतिम संस्कार

Khozmaster
1 Min Read
चौकशी करुन अंतिम कारवाई करण्याच्या अटीवर मृतदेहांवर करण्यात आले अंतिम संस्कार
लोणार:-(तानाजी मापारी)
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ शिवारातील गायरान परिसरात ओढ्यामध्ये पारधी समाजातील मुलगा आणि वडिलांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी उघडकीस आल्या नंतर याप्रकरणी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत काहीं संशयीतांची चौकशी करुन अंतिम कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर ३६ तासाने  मृतदेहावर रामपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आला आहे.मृतकाच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवत खून केल्याची तक्रार लोणार पोलिसात दिली आहे.यावरुन पोलिसांनी सदर प्रकरणात संशयितांची चौकशी करुन याप्रकरणी दोषी आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई  करण्याचे आश्वासन दिल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी उशिरा दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघांवर अंतिम संस्कार केले सदर घटनेचा पुढील तपास लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, करत आहे.यावेळी अंतिम संस्कार करतांना  पोलिस उपनिरीक्षक गोपाल राठोड,संजय जाधव, बिट जमादार गजानन सानप,विशाल धोंडगे,गणेश लोढे, नितीन खर्डे,अनिल शिंदे, मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप हे उपस्थित होते
0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *