आज सुरज चव्हाण याने दाखवून दिले आहे. सर्वसामान्य कुटुंब, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गरिबी यांसारख्या समस्यांना तोंड देत सुरज इथपर्यंत येतो ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. बिग बॉसच्या घरात वावरत असताना ‘पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना’ या ओळींप्रमाणे सुरजने नेहमीच मराठी संस्कृतीचे दर्शन घडविलेले आहे. मोठ्यांचा आणि स्त्रियांचा आदर, घरातील गोष्टींची काळजी आणि स्वच्छता यांचे पालन करायला तो कधी विसरला नाही. हा विजय फक्त सुरजचा नसुन तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांचा आहे. या विजयाबद्दल सुरजचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Users Today : 5