सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जॅम्परोप स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटातील डबल अंडर रिले, प्रकारात कु.भक्ती खंदारे कु. संजीवनी राठोड कु. दिपाली चिंचोले,कु. सायली भुजबळ या 4 खेळाडू मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष मा. रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सतीशजी गव्हले, उपप्राचार्य रामेश्वरजी कुटे, पर्यवेक्षक दंडे सर, तायडे सर, सर्व शिक्षक कर्मचारी बंधू-भगिनी तसेच क्रीडा अधिकारी लांडगे मॅडम, जिल्हा जंपरोप संघटनेचे सचिव माधव मंडळकर, पंच देवानंद नेमाने यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष गुळवे,होमराज कोळी यांनी मार्गदर्शन केले.
Users Today : 5