मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
सहकार विद्या मंदिर डोणगाव चे सहाय्यक शिक्षक निलेश कनिराम राठोड
‘नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम’ भारत सरकार द्वारा ‘राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या त्यांच्या उपलब्धी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.सहकार विद्या मंदिर डोणगाव चे मुख्याध्यापक गाढे सर उपमुख्याध्यापक नखोत सर तसेच त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद त्यांचे भारत स्काऊट गाईड बुलडाणा जिल्ह्याचे संघटक सुभाष आठवले सर गाईड विभाग संघटक सौ.कविता पवार मॅडम व मित्र मंडळ,शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे कौतुक अभिनंदन केले आहे.स्काऊटच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व तसेच त्यांनी केलेल्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी धुळे येथे करण्यात आले परिषदेचे राष्ट्रीय सल्लागार गोपाल देवरे, सचिव जय बागुल, डॉक्टर ज्योती लष्करी अध्यक्ष प्रफुल पाटील, मंदाकिनी भाकरे,ईश्वरी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार स्मिता वाघ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यापूर्वी त्यांना शासनाने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यापैकी उपक्रमशील शिक्षक जिल्हा पुरस्कार, राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार,योग क्षेत्रातील प्लॅटिनम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. स्काऊट मध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
Users Today : 5