मुख्य कार्यकारी अधिकारी कापरे यांच्या हस्ते कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची महाआरती

Khozmaster
1 Min Read
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी)
शहरामध्ये  सर्वात लोकप्रिय गरबा व दांडिया महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून मेहकर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कापरे  यांच्या हस्ते चौथ्या दिवसाच्या  महाआरतीने कृषी वैभव लॉन येथे सुरू असलेल्या कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाला सुरुवात करुन  गरबा व दांडिया महोत्सवात सहभागी व उपस्थित असलेल्या महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ.रुपाली कापरे ह्या सुद्धा उपस्थित होत्या. सर्वप्रथम  आयोजकाच्या वतीने कापरे दांपत्याचे स्वागत करण्यात आले आणि  महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी सौ. स्वाती प-हाड मॅडम, मिश्रा मॅडम,सौ. रुपाली गारोळे आदिंचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.

        गरबा व दांडिया महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व  विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येते.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष चव्हाण सहाय्यक अभियंता वाशिम, देवराव पवार वनविभाग अधिकारी मेहकर, चेतन चव्हाण राष्ट्रीय बुद्धिबळ मार्गदर्शक पुणे व इतर सर्वजण परिश्रम करीत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक महेश रिंढे, सुरेश चव्हाण व सौ.प्रिया चव्हाण यांनी कळविले आहे

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *