म.ज्यो. फुले कनिष्ठ महाविद्यालय दे.माळी ची कु. कृष्णा चोपडे कुस्तीस्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम

Khozmaster
1 Min Read
मेहकर:- (कार्यालय प्रतिनिधी) 
तालुक्यातील दे.माळी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या  कु. कृष्णा चोपडे हिने फ्री स्टाइल कुस्ती  या क्रीडा प्रकारात आपली  नेहमीची घवघवीत यशाची परंपरा यंदाही कायम ठेवून विजयी यश  संपादन केले. गत चार वर्षापासून जिल्ह्यातून तिच्या वजनी गटात प्रथम येण्याचा बहुमान तिने  मिळवला आहे.   खामगाव येथे पार पडलेल्या . वय वर्षे १९ खालील  वयोगटात ७२ किलो वजन गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत विभागासाठी आपली निवड पात्र ठरवली आहे .स्पर्धा स्थळी आमदार आकाश फुंडकर व मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव देखील करण्यात आला .कु.कृष्णा चोपडे हिने  कुस्तीत दमदार कामगिरी करत  प्रथम क्रमांक मिळवून  विभागस्तर गाठला आहे.तिच्य यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. संस्थाध्यक्ष डॉ. अनिलकुमार गाभणे  उपाध्यक्ष दि ‌.स. अंभोरे सचिव किशोर गाभणे यांनी कृष्णाचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .प्राचार्य विश्वनाथ बाहेकर  यांच्या हस्ते विजेत्या कृष्णाचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनीला  क्रीडा शिक्षिका सौ.किरण गाभणे, प्रभारी प्रशिक्षक तुकाराम मगर , आई वडील आदींचे  मार्गदर्शन लाभले. कृष्णा चोपडे हिने आपल्या विजयाचे श्रेय मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले.तर प्राचार्य  व पर्यवेक्षक यांनी विजेत्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले.तर आभारप्रदर्शन दिनेश आप्रे यांनी केले.
0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *