मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष म्हणजेच रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांनी काल म्हणजेच बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. याच्या दोन दिवसाआधी, सोमवारीच त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली होती. त्यावर लिहिले होते, “धन्यवाद, तुम्ही माझा विचार करता.”त्यांना पोस्ट का करावी लागली?
ही पोस्ट करण्यापूर्वीच केवळ सोशल मीडियावरच नाही तर अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वेबसाइट्सवर रतन टाटा यांच्याविषयी एक बातमी सुरू होती. त्यात रतन टाटा यांना रक्तदाब वाढल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ते आयसीयूमध्ये दाखल असल्याचा दावा करण्यात आला होता. याचे खंडन करण्यासाठी रतन टाटा यांनी ही पोस्ट टाकली होती.पोस्टमध्ये काय लिहिले आहे?
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (एक्स)वर पोस्ट केले होते की, ”माझ्या आरोग्याबाबत पसरलेल्या अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत. याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितींमुळे मी वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. माझं आरोग्य चांगलं आहे आणि मी जनतेला आणि माध्यमांना विनंती करतो की चुकीची माहिती पसरवू नये”.दोन दशकांहून अधिक काळ देशातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे अध्यक्ष
मार्च १९९१ मध्ये रतन टाटा यांनी देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. २०१२ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतरही ते टाटा समूहाची ध्वजवाहक कंपनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष राहिले. २००८ मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना २००० मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.
सोशल मीडियावर खूप लोकप्रिय
आयुष्यभर बॅचलर असलेले रतन टाटा ट्विटर किंवा एक्ससह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे X (एक्स)वर १.३ करोडपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर इंस्टाग्रामवर सुमारे १ करोड लोकं त्यांना फॉलो करतात.
Users Today : 11