माझ्या संकल्पनेतील भव्यदिव्य वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा संत – महंतांच्या साक्षीने संपन्न..!

Khozmaster
2 Min Read

माझ्या संकल्पनेतून बुलढाणा शहरांमध्ये राज्यातील पहिले सर्व सोयीसुविधा-युक्त वारकरी भवन पूर्णत्वास आलेली आहे, या वारकरी भवनामध्ये दोन ते अडीच हजाराच्यावर वारकरी आपला मुक्काम करू शकतात, त्यांच्या भोजनाची देखील गैरसोय होऊ नये याकरिता अध्यायवत किचन, ताटापासून ग्लासापर्यंत,वाट्यापासून प्लेटापर्यंत सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे…!

दिनांक- ११ ऑक्टोबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील रामनगर परिसरामध्ये भव्य दिव्य सर्व सोयीसुविधायुक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन लोकार्पण सोहळा माझ्या अध्यक्षतेखाली संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला…!

यावेळी त्या ठिकाणी प्रामुख्याने व्यासपीठावर माझ्या धर्मपत्नी बुलढाणा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सौ. पुजा संजय गायकवाड, दत्त संस्थान धाराशिव येथील राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त समिती सदस्य श्री. प्रकाश महाराज जवंजाळ, श्री. वाघ महाराज गुरुजी, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,श्री. वासुदेव शास्त्री महाराज रुक्मिणी पांडुरंग संस्थान, वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष श्री. दामुअण्णा महाराज शिंगणे, श्री. राजेंद्र महाराज तळेकर, भागवताचार्य सौ. रेणुकाताई जाधव, श्री. किरण महाराज शिंदे, सागर महाराज भोंडे, श्री. राजेश महाराज मुंगळे, शिवसेना माजी शहरप्रमुख मुन्नाजी बेंडवाल, श्री. राजेशजी देशलहरा, घनश्यामजी चोपडा, विजय बाफना, श्री. विठ्ठलराव येवले, नगरसेवक दीपक सोनुने, आशिष जाधव, गोविंदा खुमकर, उमेश कापुरे, मंदार बाहेकर, बाळासाहेब धुड, मोहन पऱ्हाड, अरविंद होंडे, उदयदादा देशपांडे, शामराव घट्टे, सरपंच प्रवीण जाधव, नितीन सुपे,अजय बिल्लारी, देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र काळे, विजय काळवाघे,निलेश पाटील,विष्णुमामा मुळे, गोटू शर्मा, गोटू येरमुले, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, रोहित गवळी, शासकीय कंत्राटदार अमित जाधव यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक माता-भगिनी,वारकरी संप्रदायातील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *