लोणार सरोवर आर्थिक स्थिती बळकट करण्याचे पर्यटनस्थळ ठरेल:-डॉ.अनिल मापारी
लोणार:- (तानाजी मापारी)
जागतीक दर्जाचे
लोणार सरोवर पर्यटनस्थळ हे
शहरवासीयांसाठी आर्थिक स्थिती
बळकट करण्याचे पर्यटनस्थळ
ठरेल,असे प्रतिपादन
नगरसेवक तथा पत्रकार डॉ.अनिल मापारी यांनी केले .
महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने
जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत
होते.”पर्यटन आणि शांतता” हे
जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असुन,
त्या अनुषंगाने
एमटीडीसीच्या सभागृहात या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एमटीडीसीचे यावेळी एमटीडीसीचे
व्यवस्थापक सदानंद दाभाडे,मंडळ अधिकारी संतोष जाधव,नगरसेवक डॉ अनिल मापारी,गणेशराव मापारी,विस्तार अधिकारी
गुलाबराव राठोड,हॉटेल तुळजाई चे संचालक भारत राठोड,डॉ.दयानंद ओव्हर,दहातोंडे सर,अरुण मापारी,सर्पमित्र विनय कुलकर्णी,मुख्याध्यापक
मंगेश शेटे,पत्रकार रहेमान नौंवरंगाबादी,
सचिन कापुरे यांच्यासह लोणार
सरोवर गाईड अमोल सरदार शैलेश सरदार आणि मी लोणारकर
संस्थेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित
होते.

डॉ.अनिल मापारी यांनी यावेळी
लोणार येथे पर्यटनासाठी अत्यंत
समृद्ध आणि अनुकूल परिस्थिती
असल्याचे सांगितले. लोणार
सरोवरातील नैसर्गिक सौंदर्य व
पुरातन धार्मिक मंदिरे नेत्रदीपक
आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही
याला फार महत्त्व आहे. पर्यटनाच्या
दृष्टीने शहरासह सरोवर परिसरात
धार तीर्थाच्या ठिकाणी
विकासकामांना दिवसेंदिवस गती
येत आहे असेही त्यांनी सांगितले.लोणार
सरोवरा संदर्भात पशुपक्षी अभयारण्य
आणि ऐतिहासिक धार्मिक
स्थळांबाबत शासनस्तरावर लघुपट
तयार करुन बंद झालेला लोणार
महोत्सव दरवर्षी सुरु ठेवावा,अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी एमटीडीसीच्या पर्यटक
निवासांच्या नव्याने छापण्यात
आलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन
करण्यात आले.यावेळी संतोष जाधव,अरुण मापारी आदी
मान्यवरांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महाराणा प्रताप
हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 6