स्थानिक गुन्हे शाखा व लोणार पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई

Khozmaster
3 Min Read
लोणार:-(कार्यालय प्रतानिधी)
पोलीस स्टेशन लोणार व स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, ग्राम सावरगांव मुंढे येथे गावात काही इसम अवैधरित्या दारु विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने लोणारचे ठाणेदार निमीष मेहेत्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक. धनंजय इंगळे, स्थानिक गुन्हा शाखेचे स. फौ. राजकुमार राजपुत , बीट जमादार गजानन सानप, पोकॉ कृष्णा निकम, पोकॉ विजय वारुळे गजानन दराडे यांचे संयुक्त पथक तयार केले. सदर पथकाने साध्या वेशात ग्राम सावरगांव मुंढे येथील तांडा येथे जावुन लोणार जिंतुर रोडवर स्वतःच्या किराणा दुकानात मधुकर तुळशीराम चव्हाण हा इसम  अवैध्यरित्या देशी व विदेशी दारुची विक्री करतांना आढळून आल्याने त्याचे दुकाची झडती घेतली असता इंपेरिअल ब्लु कंपनीच्या प्रत्येकी१६० रुपये किंमतीच्या १२ बॉटल,एमडी कंपनीच्या प्रत्येकी १५० रुपये किंमतीच्या १६ बाटल्या, बी-०७ कंपनीच्या प्रत्येकी १६० रुपये किंमतीच्या ०२ बाटल्या, देशी दारु भिंगरी संत्रा १८० एमएल.च्या प्रत्येकी ७० रुपये किंमतीच्या १० बाटल्या,देशी दारु भिंगरी संत्रा ९० एमएल.च्या प्रत्येकी ३५ रुपये किंमतीच्या ११ बाटल्या, रॉयल चॅलेंजर कंपनीच्या बीअरच्या प्रत्येकी १०० रुपये किंमतीच्या १७ बाटल्या,टयुबर्ग कंपनीच्या बीअरच्या प्रत्येकी १५० रुपये किंमतीच्या ०७ बाटल्या  असा एकुण ८४७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल  मिळुन आला. त्यानंतर त्याच गावातील पंढरी रामकिसन नागरे व आनंदा राधाकिसन मुंढे हे रोडला लागुन असलेलया टिणाच्या शेडमधे देशी दारूची अवैध्य विकी करित असल्याचे प्रत्यक्ष मिळुन आल्याने सदर टिनशेडमधे देशी दारू भिंगरी संत्रा १८० एमल च्या ३३ बाटल्या, देशी दारु भिंगरी संत्रा ९० एमएल. च्या ०८ बाटल्या  असा एकुण २५९० रुपये किंमतीचा माल मिळुन आल्याने सदर माल जप्त करुन अवैधरित्या दारु विक्री करित असलेल्या तिनही इसमांना पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेवर गुन्हे दाखल केले व त्यांना समज पत्रावर सोडण्यात आले. या धडाकेबाज कारवाई
मुळे परिसरातील दारु अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व ठाणेदार निमीष मेहेत्रे यांचे नेतृत्वात  लोणारचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, स. फौ. राजकुमार राजपुत (स्थागुशा), बीट जमादार गजानन सानप, पोकॉ कृष्णा निकम, पोकॉ विजय वारुळे पोकॉ गजानन दराडे यांनी केली असुन पुढील तपास बीट जमादार गजानन सानप व पो कॉ कृष्णा निकम हे करित आहेत.
0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *