लोणार:-(तानाजी मापारी)
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या सरोवर परिसरात श्रध्दास्थान असलेल्या माँ कमळजा मातेचे मंदीर आहे. कित्येक कुंटुबीयांची कुलदेवी असल्याने नवरात्र उत्सवात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. दरवर्षी चंद्रपूर भंडारा नागपूरसह आंध्र प्रदेशातूनही हजारो भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येतात. तर राज्यभरातून शालेय विद्यार्थी सहलीसाठी येत
असतात

कोरोना व्हायरसचा प्रादुभार्व रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने राज्यातील प्रमुख देवस्थान मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हांपासून प्रथमच जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील कमळजा मातेचे मंदिरही दर्शनासाठी भावीकांसाठी बंद करण्यात आले होते.
माँ कमळजा मातेचे मंदीर हे निसर्गरम्य सरोवर क्षेत्रात वसलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. नवरात्र उत्सवा निमित्त नऊ दिवस भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
तीन मुख असलेल्या या मंदीराच्या उत्तरेकडील महाद्वारातून गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. माहुरच्या देवी सारखा आकार असणाऱ्या माँ कमळजा मातेचा मुखवटा तांदळासारखा आहे. पुरातन काळातील मंदीर असून साधे चूना-मातीची दीपमाळ आहे.
मंदीरासमोरच सौभाग्य तीर्थ व गोड-खारट पाण्याची सासू-सुनेची विहीर आहे. सीता वनवासात असताना ओटी भरल्याचा वाल्मीकी रामायणात
उल्लेख आहे. अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा याच मंदीरात सीतेला भेटली. लावणासुराचा जेव्हा विष्णूने वध केला तेव्हा देवी त्यांच्यासोबत आल्या असत्या त्या येथेच वास्तव्यास राहिल्याचा पुराणात उल्लेख आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी येथे इतर राज्यासह महाराष्ट्रातील भाविक-भक्त दरवर्षी नवरात्रात दर्शनसाठी येत असतात. आजही माँ कमळजा मातेच्या दर्शनाची भाविकांना ओढ आहे.
Users Today : 7