जळगाव जामोद:-(कार्यालय प्रतानिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई संतोष इंगळे , बुलढाणा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ भाई संतोष इंगळे यांच्या हस्ते पद नियुक्ती देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी पॅंथर प्रफुल तायडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रफुल तायडे यांची जळगाव जामोद तालुक्यातील अग्रेसर राजकीय नेत्यांमध्ये गणना होते.त्यांनी काही महिने अगोदर पक्षामध्ये प्रवेश केला होता. जळगाव जामोद तालुका अध्यक्ष या पदावर त्यांनी चांगले काम केल्याने त्यांच्या कामाचा आढावा घेत जिल्हाध्यक्ष्यांनी त्यांची नियुक्ती जिल्हा उपाअध्यक्ष पदी केलेली आहे. त्यांना तालुक्याच्या पदावरुन जिल्ह्यामध्ये वर्णी लागल्याने जळगाव जामोद तालुक्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रफुल तायडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष असल्याचे सांगत माझ्या सर्व समावेशक कार्याची ओळख पक्षाच्या मार्फत महाराष्ट्रात झाली असून माझी एक नवी अवलौकिक छबी तयार झालेली असून पक्षाच्या वरिष्ठांचा विश्वास झालेला आहे त्यामुळे मी पदाची गरिमा राखत निष्ठेने व पक्षाच्या वैचारिक भावनेने माझे कार्य पार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली असल्याचे प्रफुल तायडे यांनी सांगितले.